Home Breaking News धक्कादायक…विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

धक्कादायक…विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

2401

काठावर बसलेला असताना घडली घटना

रोखठोक | विहिरीच्या काठावर बसून नेहमी प्रमाणे गप्पा मारत असताना 25 वर्षीय तरुणाचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. 28 जानेवारीला रात्री तालुक्यातील धोपटाळा येथे घडली.

चेतन घोसरे (25) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो धोपटाळा येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी तो आपल्या काही मित्रांसोबत विहरीवर बसलेला होता. गप्पा रंगात आलेल्या असतानाच अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडला.

यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला, तसेच त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. ही बाब घरच्या मंडळींना कळली ते धावतच घटनास्थळी दाखल झाले मात्र बराच उशीर झाला. या घटने बाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
वणी: बातमीदार