Home Breaking News भरधाव…बोअरवेल चे वाहन पलटले, एक ठार, तीन जखमी

भरधाव…बोअरवेल चे वाहन पलटले, एक ठार, तीन जखमी

1508
C1 20240404 14205351

मेंढोली शिवारात घडली घटना

वणी: तालुक्यातील मेंढोली शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या बोअरवेल च्या वाहनाचे समोरील चाक फुटले आणि वाहन पलटी झाले. त्याखाली 20 वर्षीय मजूर दबून ठार झाल्याची घटना रविवार दि. 29 मे ला दुपारी 1:30 वाजता घडली.

रामेन अमृतला पुसाम (20) रा. सोनपरी बालाघाट असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. तर मख्खन उईके, अशोक कलमू व दिनेश गटपल्ली हे जखमी झाले आहेत. शेतात बोअरवेल मारण्यासाठी मेंढोली शिवारात मशीन क्रमांक (MH-29-T- 0579) ही रविवारी गेली होती. काम आटोपल्यावर शिरपूर कडे परत येत असताना वाहनाचे समोरील चाक फुटले आणि वाहन पलटी झाले.

यावेळी बोअरवेल वाहनाचे सपोर्टर वर चार मजूर बसलेले होते. चाक फुटताच वाहन अनियंत्रित झाले आणि सपोर्टर वरील मजूर खाली कोसळले. त्याचक्षणी सपोर्टर खाली ‘रामेन’ हा दबल्या गेला तर अन्य मजूर किरकोळ जखमी झाले.

घटना घडताच परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी सपोर्टर खाली दबलेल्या तरुणाला काढून रुग्णालयात हलवले. तर मृतकाचा भाचा निलय तिरपाल उईके (19) रा. दुनापूर, बालाघाट याने शिरपूर पोलीस ठाणे गाठून अपघाताबाबतची रीतसर तक्रार दाखल केली.

घडलेला अपघात हा बेजबाबदारपणे व भरधाव वाहन चालविल्याने घडला आहे. याप्रकरणी वाहन चालक बिचम बलम कोंडा रा. नारायणपूर, तेलंगणा याचे विरुद्ध भादवि कलम 279, 337, 338, 304 (अ), मोवाका 184 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
वणी: बातमीदार