Home Breaking News त्या… दुचाकी अपघातातील एका तरुणाचा मृत्यू

त्या… दुचाकी अपघातातील एका तरुणाचा मृत्यू

1765
C1 20240404 14205351

गंभीर जखमी सचिन वर उपचार सुरू

वणी: वणी वरून चंद्रपूरला जात असताना बेलोरा फाट्याजवळ भरधाव दुचाकी दिशादर्शक फलकावर आदळली होती. यात दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

गणेश वांढरे (26) असे त्या मृतक दुर्दैवी तरुणाचे नाव आहे तो आपला मित्र सचिन डोंगे (27) सोबत चंद्रपूरला दुचाकी क्रमांक (MH-29- BA-8705) ने जात होता. बेलोरा फाट्याजवळील वळणावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दिशादर्शक फलकावर आदळले.

मंगळवार दि.28 जूनला दुपारी ही घटना घडली, यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, जखमी तरुणांना तात्काळ उपचारार्थ चंद्रपूर ला हलवले. प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यातील सचिन डोंगे वर आज शस्त्रक्रिया करण्यात येणार असून गणेश वांढरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वणी: बातमीदार