Home क्राईम देशी कट्टा व तीन काडतुस, दोघे अटकेत

देशी कट्टा व तीन काडतुस, दोघे अटकेत

● (LCB) स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1515

(LCB)स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Crime news | नेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांचे जवळून एक देशी बनावटी पिस्तुल व तीन काडतुस जप्त करण्यात आले. ही कारवाई शनिवार दिनांक 29 जुलैला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने केली. A team of the local crime branch arrested two people who were illegally carrying dangerous firearms.

जाबिर खान वायद खान (25) रा. नवाबपुरा व निमीचंद्र धरमशेठ पवार (34) रा. आढवडी बाजार नेर अशी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपींची नावे आहेत. ते देशी कट्टा विकण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र शस्त्र बाळगणा-या व्यक्ती बाबत गोपनिय माहीती काढुन कारवाई करावी असा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना दिला होता. त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या बाबत गोपनीय माहिती संकलित केली.

नेर पोलीस स्टेशन हद्दीत LCB चे पथक पेट्रोलिंग करत होते. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने आयटीआय कॉलेज जवळील बायपास वर सापळा रचून संशयास्पद स्थितीत वाट पाहत असलेल्या दोघांची अंगझडती घेतली. यावेळी एक देशी बनावटीची पिस्तुल (अग्निशस्त्र) व मँगझीन मध्ये तिन जिवंत काडतुस व दोन विवो कंम्पनीचे मोबाईल मिळुन आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO आदित्य मिरखेलकर, LCB प्रमुख पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोन यांचे मार्गदर्शनात API गणेश वनारे, बबलु चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेद्र चौधरी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी केली.
Rokhthok News