Home Breaking News लाठी शिवारात कोंबड बाजारावर ‘धाड’

लाठी शिवारात कोंबड बाजारावर ‘धाड’

1603

तीन अटकेत, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

वणी :- शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या लाठी शिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी तीन दुचाकी सह एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बडगा साजरा केल्या जातो. या दिवशी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार खेळल्या जातो. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झालेले असते.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या लाठी गावाच्या शिवारात रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास कोंबड्याच्या झुंज लावून जुगार खेळल्या जात होता. याबाबतची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता सुभाष देवतळे (55) रा बेसा, गणेश उलमाले (21) रा निवली, व शंकर कोटनाके (30) रा तरोडा हे कोंबड्याची झुंज लावत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 3 दुचाकी, 900 रुपये नगदी, दोन मृत कोंबडे,असा एकूण 1 लाख 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वणी: बातमीदार