Home क्राईम Crime करणारे आंतरजिल्‍हा गुन्‍हेगार ‘सक्रीय’

Crime करणारे आंतरजिल्‍हा गुन्‍हेगार ‘सक्रीय’

● पोलीसांनी आवळल्‍या दोघांच्या मुसक्‍या

919

पोलीसांनी आवळल्‍या दोघांच्या मुसक्‍या

Crime News Wani | शहरात चोरट्यांनी चांगलाच आतंक माजवला आहे. पोलीस प्रशासन सतर्क असले तरी चोरटे आपले इस्‍पीत साध्‍य करतांना दिसत आहे. पोलीसांनी लगतच्या जिल्ह्यातील दोन चोरट्यांना ताब्‍यात घेतले असुन त्‍यात एक दुचाकी चोरटा तर दुसरा घरफोडी करणारा आहे. The police have arrested two thieves from the neighboring district

गणेश प्रल्हाद आडे (32) हा चोरटा चंद्रपुर जिल्‍हयातील भद्रावती येथील निवासी आहे. त्‍यांने तीन वर्षापुर्वी येथील बस स्‍थानक परिसरातुन दुचाकी चोरली होती. तो गुन्‍हा पोलीसांनी उघडकीस आणला असुन त्‍याला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. तर अवघ्‍या काही दिवसापुर्वी येथील भोंगळे लेआउट परिसरातील एका घरात चोरी करणारा आरोपी सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (26) रा. सोमनाथ वार्ड, राजुरा जि. चंद्रपुर याला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

शहरात घडणाऱ्या घटना घडामोडी बघता आंतरजिल्‍हा चोरटयांनी वणीवर लक्ष केंद्रीत केल्‍याचे दिसत आहे. पोलीसांची कार्यप्रणाली नेमकी काय असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तीन वर्षापुर्वी बसस्‍थानक परिसरातुन मोटर सायकल क्रमांक MH 29 X 4023 ही दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. या घटनेतील आरोपीला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

शहरातील भोगळे ले आउट परिसरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या अनिता चंद्रवदन कुमरे यांच्‍या घरी 21 ते 23 ऑगष्‍टच्‍या दरम्‍यान चोरटयांनी घराचे कुलुप तोडुन घरातील कपाटामधील सोन्‍याचे दागिने व अन्‍य साहित्‍य असा एकुन 44 ह‍जार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोलीसांनी शिताफीने तपास करुन चोरटयाला जेरबंद केले आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बंसोड, अप्‍पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किंद्रे, पोलीस निरिक्षक अजित जाधव यांचे मार्गदर्शनात PSI सुदाम आसोरे, सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, हरिन्दरकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम,  गजानन कुडमेथे यांनी केली.
ROKHTHOK NEWS