Home Breaking News गणेश विसर्जन मिरवणुकीत बँड वादकाचा मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीत बँड वादकाचा मृत्यू

● भीमनगर मध्ये पसरली शोककळा

3347

भीमनगर मध्ये पसरली शोककळा

Sad News Wani | येथील भीमनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या 32 वर्षीय तरुणाचा गुरुवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश विसर्जनानिमित्त तो बँड पथकासह चंद्रपूर येथे गेलेला होता. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सायंकाळी सहा वाजता बँड वाजवतानाच ही घटना घडली. The 32-year-old tragically died on Thursday night.

सिद्धार्थ मरकवाडे (32) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो येथील भीमनगर परिसरातील निवासी होता. सिद्धार्थ हा येथील एका बँड पथकाचा सदस्य होता. चंद्रपूर येथील गणेश मंडळाने या बँड पथकाला गणेश विसर्जनासाठी आमंत्रित केले होते. मिरवणुकीत ही दुर्दैवी घटना घडली. होतकरू तरुणाचा अनपेक्षित मृत्यूने भीमनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News