Home Breaking News शेत तळ्यात बुडून “शंकर”चा मृत्यू

शेत तळ्यात बुडून “शंकर”चा मृत्यू

● उकणी शिवारातील घटना

2649

उकणी शिवारातील घटना

Sad news wani | तालुक्यातील लाठी येथे वास्तव्यास असलेल्या 44 वर्षीय व्यक्तीचा उकणी शिवारातील शेत तळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. A 44-year-old man died after drowning in a farm pond in Ukani Shiwar.

शंकर खारकर (44) असे मृतकाचे नाव आहे ते लाठी या गावातील निवासी आहेत. तसेच ते ईगल ओबी कंपनी मध्ये कर्तव्यावर होते. उकणी शिवारात अजय बलकी यांचे शेत आहे. त्याच शेतात त्यांनी शेततळे निर्माण केले आहे. शुक्रवारी पहाटे तळ्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

घटनेची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतक व्यक्ती लाठी गावातील असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले आहे. परंतु मृतकाचे गाव वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे तर घटनास्थळ शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.

मृतक शंकर हा नेमका त्या शेत शिवारात कशासाठी गेला होता. ही घटना घातपात की आत्महत्या हे पोलीस तपासातून निष्पन्न होणार आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Rokhthok News