Home Breaking News Breaking…..उभ्या टिप्पर वर ट्रॅव्हल्स धडकली, अनेक जखमी

Breaking…..उभ्या टिप्पर वर ट्रॅव्हल्स धडकली, अनेक जखमी

● यवतमाळ मार्गावरील घटना ● पोलीस घटनास्थळी दाखल

1304

यवतमाळ मार्गावरील घटना
पोलीस घटनास्थळी दाखल

Accident News | अपघाताच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. रस्त्यावर उभे ठेवण्यात आलेले ट्रक, टिप्पर कर्दनकाळ बनताहेत. यवतमाळ वरून वणी कडे येत असलेली भरधाव ट्रॅव्हल्स चक्क उभ्या टिप्परला धडकली. अपघात भीषण होता. ही घटना बुधवार दिनांक 28 सप्टेंबरला रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली. अपघातात किती व्यक्ती जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. The accident rate has increased tremendously.

यवतमाळ मार्गावर गौराळा फाट्यालगत टिप्पर क्रमांक MH- 34- W-9909 हा रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचवेळी यवतमाळ वरून येणारी व चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे जात असलेली ट्रॅव्हल्स क्रमांक MH -27- A- 9994 भरधाव वेगात होती. अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली.

या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणारे प्रवाशी जखमी झाले. जखमीचा आकडा स्पष्ट होऊ शकला नाही मात्र ट्रॅव्हल्स मध्ये 50 प्रवाशी होते अशी माहिती मिळत आहे. ट्रॅव्हल्स ही अकोला येथील असल्याचे समजले असून त्यात भाविक भक्त चिमूर येथे दर्शनासाठी जात होते असे कळते. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बरेचशे प्रवाशी जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तडक घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करताहेत. या घटनेत किती व्यक्ती जखमी झाले याबत विस्तृत माहिती कालांतराने स्पष्ट करण्यात येईल.
Rokhthok News