Home Breaking News दुःखद… गणेश विसर्जन करतांना तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

दुःखद… गणेश विसर्जन करतांना तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

● बोरी गावात पसरली शोककळा

2212

बोरी गावात पसरली शोककळा

Sad News darwha | गणेशचतुर्दशी श्री चे विसर्जन करण्याची लगबग, 22 वर्षीय तरुण गावालगत असलेल्या अडाण नदीवर मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेला. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्यात गटांगळ्या खायला लागला. सोबत असणाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला अखेर अनर्थ घडलाच. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी घडली. Suddenly his leg slipped and he fell into the river water

हितेश पंचबुद्धे (22) असे मृतक तरुणाचे नाव आहे. त्याचे मातृ- पितृ छत्र हरपल्याने तो बोरी या गावी काका कडे शिक्षण घेण्यासाठी वास्तव्यास होता. गणेश विसर्जन असल्याने तो लगतच असलेल्या अडाण नदीवर गणेश विसर्जनासाठी गेला होता.

हितेश चा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला, पोहता येत नसल्याने अनर्थ घडला. तेथे उपस्थित असलेल्यांनी त्याला दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथून त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळला रेफर करण्यात आले मात्र तो पर्यंत सर्व संपले. तरुणाचा अकाली मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News