Home क्राईम Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूहल्ला

Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूहल्ला

● इसम जखमी, थोडक्यात जीव बचावला

1438
C1 20231029 19124514

इसम जखमी, थोडक्यात जीव बचावला

Crime News | ओळखीच्या गृहस्थाने दारूसाठी पैसे न दिल्याने 19 वर्षीय तरुणाने चक्क चाकूने हल्ला चढवला. यात 34 वर्षीय इसम जखमी झाला असून याप्रकरणी वणी पोलिसात दिनांक 28 ऑक्टोबर ला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. A case has been registered in Wani police on October 28.

साहील कैलास पुरी (19) असे चाकूहल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो रंगनाथ नगर, खरबडा परिसरातील निवासी आहे . 27 ऑक्टोबर ला रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान सूर्योदय चौकातील दारुभट्टी जवळ गेला. तेथील ओट्यावर त्याचे सोबत काम करणारे संदिप कैलास गेडाम (34) राहणार रंगनाथनगर खरबडा व आणखी दोघे बसून गप्पा मारत होते.

साहिल याने संदीपला दारू पिण्यासाठी पैसे मागितले व शिवीगाळ करू लागला. पैसे देण्यास नकार देत त्याला संदीपने जवळील खर्रा खा व घरी जा म्हणून म्हटले. यामुळे तो पुन्हा शिवीगाळ करायला लागला आणि अचानक त्याने कमरेजवळील चाकू काढून मारण्यास सुरुवात केली.

चाकूने तो वार करत असताना तेथे बसलेल्या तिघांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला मात्र चाकूचा घाव कमरेखालील डाव्या पार्श्वभागावर बसला. यामुळे रक्तस्त्राव झाल्याने पॅन्ट रक्ताने माखली. जखमी संदीपला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयीन अहवालावरून ASI जगदीश बोरणारे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून भादवि कलम 307, 504, 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok News

Previous articleCrime : हायवा ट्रक चोरीचा छडा अवघ्‍या 24 तासात
Next articleसुशिला दाऊपूरे यांचे निधन
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.