Home Breaking News गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ‘त्याचा’ मृतदेह

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ‘त्याचा’ मृतदेह

● चार दिवसापासून होता बेपत्ता

1283
C1 20231229 08345973

चार दिवसापासून होता बेपत्ता

Sad News maregaon : तालुक्यातील वेगाव येथील व्यक्ती मागील चार दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह करणवाडी शिवारात आढळून आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. A hanged body was found in Karanwadi premises.

ओमराज सूर्यभान राजुरकर असे मृतकाचे नाव आहे ते वेगाव येथील निवासी होते. मागील काही दिवसांपासून त्यांची मानसिकस्थिती ठीक नसल्याचे बोलल्या जात आहे. घटना उघडकीस येण्याच्या चार दिवसांपासून ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओमराज यांच्या पारिवारिक मंडळींनी त्यांची शोधाशोध केली, नातेवाईकांकडे विचारणा सुद्धा करण्यात आली मात्र ते कुठेच आढळून आले नाही. अखेर कारणवाडी शिवारात पळसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह प्रत्यक्षदर्शीला दिसला.

याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.
Rokhthok News