Home Breaking News स्ञी ही ईश्वराने निर्माण केलेली महान शक्ती

स्ञी ही ईश्वराने निर्माण केलेली महान शक्ती

453
C1 20240404 14205351

अर्चना बोदाडकर यांचे प्रतिपादन

रोखठोक | महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून कामगार व बचत गटाच्या महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर यांनी उपस्थित महिलांना विस्तृत मार्गदर्शन केले. त्या म्हणल्या की, स्ञी ही ईश्वराने निर्माण केलेली महान शक्ती आहे. स्त्रियांनी आत्मविश्वास वाढवला तर त्या यशस्वी उद्योजक होवू शकतात असे प्रतिपादन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सातत्याने महिलांच्या प्रश्नावर विविध प्रकारचे उपक्रम राबवताहेत. सर्वच स्तरातील महिलांच्या उत्थानाकरिता मनसे महिला आघाडी प्रयत्नरत आहे. बचत गटाच्या महिलांनी स्वयंरोजगार तसेच लहानसहान उद्योग सुरु करावेत व आर्थिक उन्नती साध्य करावी असे मत व्यक्त करण्यात आले.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने शनिवारी येथील जैताई वार्डात कामगार व बचतगट महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन मनसे शहर अध्यक्ष वैशाली तायडे, शहर उपाध्यक्ष पूजा बनसोड यांनी केले. याप्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष अल्का टेकाम, मारेगाव तालुका अध्यक्ष प्रतीभा तातेड, वणी शहर उपाध्यक्ष ज्योती मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होत्या.
वणी: बातमीदार