Home Breaking News निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्‍या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्‍या

● PSI बूधवंत शिरपुर तर PSI हिरे मुकूटबन

1556
C1 20240130 13054848

PSI बूधवंत शिरपुर तर PSI हिरे मुकूटबन

Wani News : पोलीस उपनिरिक्षक ते पोलीस निरिक्षक तसेच वरिष्‍ठ अधिकारी यांच्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्‍या करण्‍यात येत आहे. उपविभागातील शिरपुर पोलीस ठाण्‍यात PSI रावसाहेब बुधवंत तर मुकूटबनला PSI प्रविण हिरे यांची बदली करण्‍यात आली आहे. PSI Raosaheb Budhwant has been transferred to Shirpur police station and PSI Pravin Here has been transferred to Mukutban.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विहित निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे पोलीस महा संचालक यांना सुचवले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांचे खांदेपालट करण्‍यात येत आहे.

वणीचे ठाणेदार (PI) अजित जाधव यांची अमरावती परिक्षेञातील अकोला येथे तर सपोनि (API) माया चाटसे यांची पांढरकवडा येथे बदली करण्‍यात आली आहे. तसेच शिरपुर येथील पोलीस उप निरिक्षक रामेश्‍वर कांदूरे यांना स्‍थानिक गुन्‍हे शाखा येथे देण्‍यात आले आहे.

नुकतेच जिल्‍हा पोलीस अधिक्षकांनी पोलीस उपनिरिक्षकांच्‍या बदलीचे आदेश पारित केले आहे. यामध्‍ये लोहारा पोलीस ठाण्‍यात कार्यरत PSI प्रविण देविदास हिरे यांना मुकूटबन तर यवतमाळ सिटी पोलीस ठाण्‍यात कर्तव्‍य बजावणारे PSI रावसाहेब विनायक बुधवंत यांची शिरपुर पोलीस ठाण्‍यात बदली करण्‍यात आली आहे.
ROKHTHOK NEWS