Home Breaking News अज्ञात भामट्यांनी, राजू तुराणकर यांची बोलरो कार पेटवली

अज्ञात भामट्यांनी, राजू तुराणकर यांची बोलरो कार पेटवली

● मध्यरात्री घरा समोरच घडली घटना

1660
C1 20240404 14205351

मध्यरात्री घरा समोरच घडली घटना

रोखठोक | प्रगती नगर परिसरात वास्तव्यास असलेले शिवसेना (शिंदे गट) चे नेते राजू तुराणकर यांची घरा समोर उभी असलेली बोलेरो कार अज्ञात भामट्यांनी पेटवली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. As soon as he came out of the house, he noticed that the car was on fire.

राजू तुराणकर यांचे बंधू तोमदेव किसनराव तुराणकर यांचे नावे दोन बोलेरो महिंद्रा कंपनीच्या कार आहेत. त्या पारिवारिक वापरासाठी असून कार क्रमांक MH31 CS 7900 ही गाडी घटनेच्या दिवशी राजू तुराणकर कामानिमित्त यवतमाळ ला घेऊन गेले होते. वणीला परतल्यावर त्यांनी कार घरा समोर उभी केली.

रात्री उशिरा शेजारी वास्तव्यास असलेल्या गृहस्थाला कार मधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच तुराणकर यांना ही बाब सांगितली. घराच्या बाहेर येवुन बघताच गाडीने पेट घेतल्याचे लक्षात आले. पाणी टाकून आग आटोक्यात आणली.

अज्ञात भामट्यांनी गाडीचा डाव्या बाजुच्या दरवाजाचा काच दगडाच्या साह्याने फोडला, त्यानंतर पेट्रोल किंवा ज्वलनशिल पदार्थ टाकुन आग लावण्यात आल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गाडीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अज्ञात भामट्यांचा छडा लावून त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार