Home वणी परिसर राजमाता अहिल्यामाई यांची जयंती जनसामान्यांचा लोकोत्सव

राजमाता अहिल्यामाई यांची जयंती जनसामान्यांचा लोकोत्सव

राजमाता अहिल्यामाई यांची जयंती जनसामान्यांचा लोकोत्सव

187
C1 20240404 14205351

भव्य बाईक रॅली व व्याख्यानाचे आयोजन

Punyashloka Rajmata Ahilyamai |वणी शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात तसेच जनसामान्यांचा लोकोत्सव म्हणून साजरा होणार आहे. माईच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय एकात्मचे दर्शन घडविणारा हा सोहळा अनोखा आणि अतुलनीय असणार आहे. भव्य बाईक रॅली व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.This ceremony is going to be unique and incomparable to show national unity

राजमाता अहिल्यामाई होळकर यांची 298 वी जयंती संपूर्ण भारतभर बुधवार दि. 31 मे ला उत्साहात साजरी होत आहे. राजमाता अहिल्यामाईंचे अतुलनीय, लोककल्याणकारी कार्याची महती व दखल संपूर्ण जगताने, देशी-विदेशी लेखकांनी घेतलेली आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे व सर्व जाती, धर्मातील लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवित जाहीर कार्यक्रमाद्वारे जयंती साजरी करून जनसामान्यांसाठी तो लोकोत्सव व्हावा ह्या उदात्त हेतूने भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे.

येथील वाघोबा खंडोबा देवस्थान येथे राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दुपारी 4.00 वाजता बाईक रॅलीचा शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊ चौक (चिखलगाव) येथून होणार असून मार्गक्रमण साई मंदिर चौक, बस स्टैंड चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, जटाशंकर चौक, महात्मा गांधी चौक, कर्मयोगी गाडगेबाबा चौक, शहिद भगतसिंग चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शिवतीर्थ परीसराजवळ सांगता होणार आहे.

अहिल्याप्रेमी बांधवांचे शुभेच्छा बॅनर, बाईक रॅली मध्ये प्रत्येकाने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावयाचे आहे तसेच रॅलीत पिवळे झेंडे, पताका लावून घोषणा देत शांततामय वातावरणात निघणार आहे, झाकी काढून त्यामध्ये राजमाता अहिल्यामाई होळकर, राजश्री मल्हारराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी भिमामाई होळकर यांची वेशभूषा असणार आहे. शहरातील प्रत्येक चौकातील पुतळ्याना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येणार असल्याचे अयोजन समितीने स्पष्ट केले आहे.

बीड येथील सुप्रसिध्द व्याख्याते तथा प्रबोधनकार प्रा. ज्ञानदेव काशिद यांचे प्रबोधनपर व्याख्यान सायंकाळी 7 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय लव्हाळे, अध्यक्ष, राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती महोत्सव समिती तर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. भालचंद्र चोपणे माजी कुलगुरूहे असणार आहेत.

समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती महोत्सव समिती वणी, धनगर समाज संघर्ष समिती- वणी मारेगाव व झरी, खंडोबा- वाघोबा देवस्थान वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणी, राजमाता अहिल्यामाई होळकर महिला विचारमंच वणी, धनगर अधिकारी/ कर्मचारी संघ वणी मारेगाव व झरी तसेच सह आयोजक ओबीसी (VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी मारेगाव व झरी यांनी केले आहे.
Rokhthok News