Home क्राईम संतापजनक.. जन्मदात्रीच झाली विकृत वासनेची ‘शिकार’

संतापजनक.. जन्मदात्रीच झाली विकृत वासनेची ‘शिकार’

999
C1 20240404 14205351

मनसुन्न करणारी घटना, पवित्र नात्याला फासली “काळिमा”

वणी बातमीदार: तालुक्यातील ब्राह्मणी शिवारात आपल्या जन्मदात्रीला वासनेची शिकार केल्याची खळबळजनक घटना आज दि. 30 जुलै ला उघडकीस आली.घडलेल्या घटने मुुुळे प्रचंड संताप निर्माण होत आहे, आरोपीला पीडित मातेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अटक केली आहे मात्र घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी व संतापजनक आहे.

जन्म देताच गळ्याला नख लावले असते तर आज ही लाजिरवाणी घटना घडली नसती. जन्मदात्रीला वासनेची शिकार करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  परन्तु मानवजातीला काळिमा फासणारी ही घटना मनसुन्न करणारी आहे. त्या परिसरात वास्तव्यास असलेला 27 वर्षीय नराधम अविवाहित होता. लगतच असलेल्या कोल ऑशरीत तो कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते घटनेच्या दिवशी दि.23 जुलै ला तो मद्यधुंद अवस्थेत घरी पोहचला. मध्यरात्री त्याची नियत फिरली, जन्मदात्री एकटीच झोपलेली असताना तीच्यावर बळजबरीने अत्याचार केला. स्वतःच्या मुलानेच असले अश्लिल व घृणास्पद कृत्य केल्याने त्या मातेने भल्या पहाटे विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पीडित माता कमालीची अस्वस्थ होती, प्रकृती स्थिर होताच तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपल्यावर घडलेली आपबिती  तिने कथन केली. ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य बघता तात्काळ गुन्हा नोंद केला. आरोपीला ताब्यात घेत भारतीय दंड विधान कलम 376  (2) एफ एन 323, 506 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अरुण नाकतोडे करीत आहे.

Previous articleलग्नाचे आमिष दाखवून विधवेचे शोषण
Next articleत्या..खड्डयात बसून करणार आंदोलन
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.