Home वणी परिसर ग्रामसंवाद सरपंच संघाच्या तालुकाध्यक्ष पदी अविनाश लांबट

ग्रामसंवाद सरपंच संघाच्या तालुकाध्यक्ष पदी अविनाश लांबट

208

मारेगाव बातमीदार : दीपक डोहणे 

महाराष्ट्र राज्य ग्रामसंवाद सरपंच संघाची मारेगाव तालुका कार्यकारणी आज ता. २९ जुलै गठीत करण्यात आली.

कार्याध्यक्ष बाबाराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत कार्यकारिणी घोषित करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक म्हणून अँड. देवा पाचभाई , नवजीवन संस्था मारेगाव मारोती पाचभाई, प्रशिक्षक संतोष आस्वले होते. या प्रसंगी  कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांची प्रदेश कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली. तर मारेगाव तालुका अध्यक्ष पदी सिंधी महागाव उपसरपंच अविनाश लांबट यांची सर्वानुमते  निवड करण्यात आली. सचिवपदी देवाळा उपसरपंच सुरेश लांडे, उपाध्यक्ष नरसाळा उपसरपंच यादवराव पांडे, उपाध्यक्ष घोडदरा विनोद आत्राम, उपाध्यक्ष धामणी सरपंच सुरेखा चिकराम, समन्व्यक सरपंच सिंधी निलिमा थेरे, सरचिटणीस सरपंच चिचमंडळ वैशाली परचाके, सरचिटणीस सरपंच चोपण शारदा गोहोकार,सरचिटणीस सरपंच गदाजी बोरी प्रविण नान्हे, सरचिटणीस कोसरा पांडुरंग ननावरे, कोषाध्यक्ष सरपंच मांगरूळ जगदीश ठेंगणे यांची निवड करण्यात आली.