Home Breaking News Accident..भरधाव कारची धडक, तरुण ठार

Accident..भरधाव कारची धडक, तरुण ठार

1374
Img 20240613 Wa0015

चिंचोली संगम फाट्याजवळील घटना

उमरखेड | नागपूर- तुळजापूर मार्गावर उमरखेड शहराजवळील चिंचोली संगम फाट्यालागत कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या अपघातात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी 4:30 वाजता घडली.

सुमेध गोविंद निखाते (26) असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. तो नांदेड जिल्ह्यातील धनेगांव येथील निवासी होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या दुचाकी क्रमांक MH- 26- BM- 0796 ने नांदेड वरून ढाणकीकडे जात असताना ही घटना घडली.

नांदेड कडे जाणारी चारचाकी क्रमांक MH- 38- V- 4026 ही कार भरधाव वेगात होती. विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला समोरासमोर धडकली. अपघात भीषण होता यावेळी गंभीर जखमीला उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

उमरखेड पोलिसांनी कारचालका विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहे.
उमरखेड : बातमीदार

C1 20240529 15445424