Home Breaking News Breaking…पोलीस वाहनाला अपघात, एक ठार, दोन जखमी

Breaking…पोलीस वाहनाला अपघात, एक ठार, दोन जखमी

● कोसदनी घाटात घडली घटना

3062

कोसदनी घाटात घडली घटना

Accident News | नागपूर-तुळजापूर मार्गावरील आर्णीच्या पुढे असलेल्या कोसदनी घाटात महामार्ग पोलीस वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडला तर दोघे गंभीर जखमी आहेत. ही भीषण घटना आज मध्यरात्री घडली. A highway police vehicle has met with a terrible accident in Kosdani Ghat.

संजय नेटके असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर संतोष हराळ गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे. तसेच जखमी असलेल्या कुणाल साळवे यांचेवर क्रीटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

c1_20230730_09504651

महामार्गावरील कोसदनी लगत महामार्ग पोलिसांची चौकी आहे. मद्यरात्रीच्या सुमारास पोलीस वाहनाला भीषण अपघात झाला. यात वाहनाचा चेंदामेंदा झाला असून नेमका अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र अज्ञात वाहनाने पोलीस वाहनाला मागून धडक दिली असावी असा कयास वर्तवण्यात येत आहे.
Rokhthok News

ही बातमी सुद्धा वाचा…

त्या ….भीषण अपघातात दोघे ठार

Previous articleदेशी कट्टा व तीन काडतुस, दोघे अटकेत
Next articleत्या ….भीषण अपघातात दोघे ठार
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.