Home Breaking News लाचखोर तलाठी ACB च्या जाळ्यात

लाचखोर तलाठी ACB च्या जाळ्यात

3786

अतिवृष्टी नुकसान भरपाई चे मायाजाळ
शेतकऱ्याला मागितले दीड हजार

वणी: अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळणार आहे. लाभार्थी यादीमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी तलाठ्याने चक्क शेतकऱ्याला दीड हजार रुपयांची मागणी केली. ACB च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि सी.एस.सी सेंटर चालकाच्या माध्यमातून लाच स्विकारांना रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार दि.29 ऑगस्टला उमरखेड येथे करण्यात आली.

गणेश सदाशिव मोळक (43) व सौरभ संजय नाथे (28) अशी लाचखोराची नावे आहेत. तलाठी मोळक हे साजा धनज येथे कार्यरत आहे. तर नाथे हा सी.एस.सी सेंटर आसरा कॉम्प्युटर, मल्टी सर्व्हिसेस उमरखेड असे खाजगी ईसमाचे नाव आहे.

अतिवृष्टी झाल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या लाभार्थी यादीमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी प्रती लाभार्थी तीनशे रुपयांची मागणी तलाठी गणेश मोळक यांनी केली. याकरिता पाच लाभार्थ्यांचे पंधराशे रुपये सिएससी सेंटर चालक सौरभ नाथे यांचेकडे देण्याचे सांगितले.

पीडित शेतकऱ्यांनी या प्रकरणी अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. सोमवारी ACB ने सापळा रचला असता तलाठी मोळक याच्या सांगण्यावरून सौरभ नाथे याने तक्रारदार यांचेकडून 1 हजार 500 रुपये लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शैलेश प्र. सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट अब्दुल वसीम, राहुल गेडाम, सचिन भोयर, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, पोलीस उपनिरीक्षक कोकेवार यांनी केली.
वणी: बातमीदार