Home क्राईम शहरात चोरटयांचा धुडगूस, 86 हजारांचा ऐवज लंपास

शहरात चोरटयांचा धुडगूस, 86 हजारांचा ऐवज लंपास

● पटवारी कॉलनी परिसरातील घटना

600
C1 20240404 14205351

पटवारी कॉलनी परिसरातील घटना

Wani News | मागील काही दिवसात बंद घरे चोरटयांनी लक्ष केल्‍याचे दिसत आहे. सातत्याने होत असलेल्‍या चोरीच्‍या घटनांनी शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी मध्‍यराञी लालगुडा परिसरातील पटवारी कॉलनीत चोरटयांनी डाव साधला व 86 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. An atmosphere of fear has been created in the city due to the continuous incidents of theft.

वेकोलीत कर्तव्‍यावर असलेले प्रविण ताजने हे पटवारी कॉलनीत वास्‍तव्‍यास आहेत. त्‍यांच्‍या बंद घरी चोरटयांनी सोमवारी मध्‍यराञी प्रवेश केला आणि सोने चांदीच्‍या दागीन्‍यासह 4 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केली.

दुसऱ्या दिवशी ते घरी परतले असता त्‍यांना घरात चोरी झाल्‍याचे लक्षात आले. त्‍यांनी याप्रकरणी पोलीसात धाव धेत रितसर तक्रार दाखल केली आहे. मागील काही दिवसात भोंगळे लेआऊट, मारुती टाऊनशिप व आता पटवारी कॉलनीत चोरांनी बंद घरेच टार्गेट केल्‍याचे दिसत आहे.

चोरी प्रकरणात पोलीसांनी गुन्‍हा नोंद केला असुन तपास यंञणा कार्यान्वित केली आहे. तर भोंगळे ले आऊट मधील चोरीचा छडा लावण्‍यात आला असुन चोरटयाला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. पोलीस सुध्‍दा ‘एक्‍शनमोड’ मध्‍ये आल्‍याचे सकृतदर्शनी दिसत असले तरी गस्‍त वाढवणे गरजेचे झाले आहे.
ROKHTHOK NEWS