Home Breaking News ठाण्यातच रंगला फौजदार व अमलदारात फ्रीस्टाईल ‘दांडिया’

ठाण्यातच रंगला फौजदार व अमलदारात फ्रीस्टाईल ‘दांडिया’

2131
C1 20240404 14205351

पोलीस ठाण्याची अब्रू चव्हाट्यावर

वणी: कायदा व सुव्यवस्थेचे रक्षकच एकमेकांची उणीदुनी काढून आपापसात भिडत असतील तर….! आणि घडलं तसंच, ठाण्यात चक्क फौजदार व अमलदारात फ्रीस्टाईल ‘दांडिया’ रंगला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी सारवासारव करण्यात येत असली तरी पोलीस ठाण्याची अब्रू मात्र चव्हाट्यावर आली आहे.

वणी पोलीस ठाणे ‘राम’भरोसे असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही. गुन्ह्याचा आलेख वाढताना दिसत आहे, दिवसाढवळ्या चोरी, लुबाडणूक, फसवणुकीच्या घटना घडताहेत. तर दागिने खरेदीच्या नावाने लाखो रुपयांचा गंडा घालण्यात येतोय.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरांडे आपले इस्पित साध्य करताना दिसत आहे. लाखो रुपयांची रोकड लंपास करून अख्ख दुकानच पेटवून देण्याचं धाडस चोरटे करताहेत. पोलिसांचा वचक संपुष्टात आल्याचे हे द्योतक आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस प्रशासनाने दक्ष असणे गरजेचे आहे. सण उत्सवाचे दिवस आहेत, गुन्हेगार, समाज विघातक कृत्य करणाऱ्या वर जरब बसवण्याची जबाबदारी ठाणेदारांची आहे. त्याप्रमाणेच आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तीचे पालन करावे याकरिता ठाणेदारांनी कठोर असणे अभिप्रेत आहे.

पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री फौजदार व अमलदारात चांगलीच जुंपली. फ्रीस्टाईल बाचाबाचीमुळे काही काळ काय होत आहे हेच कळायला मार्ग नव्हते. घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून कायद्याचे रक्षकच असे कृत्य करायला लागल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
वणी : बातमीदार

झालेली घटना निंदनीय आहे याचा अहवाल तयार करण्यात आला असुन तो जिल्ह्या पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात येणार आहे. आणि याप्रकरणी दोषीवर योग्य ती कारवाही केली जाणार आहे
संजय पुजलवार
उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी