Home Breaking News दुर्दैवी… मळणी यंत्रात अडकल्याने मजुरांचा मृत्यू

दुर्दैवी… मळणी यंत्रात अडकल्याने मजुरांचा मृत्यू

1798
Img 20240613 Wa0015

खडकी गणेशपुर येथील घटना

शेतातील सोयाबीन काढतांना मळणी यंत्रात नजरचुकीने हात गेला आणि घात झाला. ही घटना शनिवार दि. 30 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता झरी जामनी तालुक्यातील खडकी गणेशपुर येथे घडली असून कमालीची खळबळ माजली आहे.

विलास भूदाजी तोडासे (55) असे मृतकाचे नाव असून तो भाराडी जिल्हा चंद्रपूर येथील निवासी आहे. तालुक्यात सोयाबीन काढणीची धावपळ सुरू आहे. मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतकरी अन्य ठिकाणावरून मजूर अनताहेत.

खडकी गणेशपूर येथील ठावरी नामक शेतकऱ्याने शेतातील सोयाबीन काढण्याकरिता मळणी यंत्र आणले होते. यावर काम करण्याकरिता अन्य मजुरांसह विलास हा सुद्धा होता. सोयाबीन काढत असताना त्याचा तोल जाऊन मळणी यंत्राच्या पट्ट्यावर पडला व यंत्राच्या आत ओढल्यागेला त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुकूटबन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू नवरे व संतोष मडावी यांनी घटनास्थळ गाठून घटना पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदना करीता झरी येथे पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने शोककळा पसरली आहे.
झरी: बातमीदार

C1 20240529 15445424