Home Breaking News पुन्हा…शहरातील दोन दुकाने चोरट्यानी ‘फोडले’

पुन्हा…शहरातील दोन दुकाने चोरट्यानी ‘फोडले’

1342

पुन्हा चोरीचे सत्र सुरू

रोखठोक |- मागील दोन महिन्यात शहरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने यावर अंकुश लागला होता मात्र मंगळवारी रात्री पुन्हा दोन दुकाने फोडून चोरट्यानी पोलिसांना आव्हान दिले आहे.

शहरात दोन महिन्या पूर्वी चोरीचे सत्र सुरू झाले होते. बंद घरे चोरट्यांचा निशाण्यावर होते तर चोरट्याने एका पत्रकारावर हल्ला देखील केला होता. पोलिसांचा वचक संपला की काय असा प्रश्न जनता विचारत होती.

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने चोऱ्या आटोक्यात आल्या होत्या. गेल्या महिन्याभरा पासून शहरात एकही चोरी झाली नाही. मात्र मंगळवारी रात्री बस स्थानक परिसर व साई मंदिर जवळील दोन दुकाने चोरट्यानी फोडल्याने चोरटे अजूनही सक्रिय असल्याचे दिसत आहे. या चोरीत किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला हे स्पष्ट झाले नसले तरी चोरट्यानी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.
वणी: बातमीदार