Home Breaking News ‘रंगनाथ’ला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव

‘रंगनाथ’ला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव

1547
C1 20240404 14205351

● ….त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन
● ऍड. देविदास काळे यांची पत्र परिषद

रोखठोक | विदर्भातील प्रतिथयश संस्था म्हणून ओळखल्या जात असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची हेतुपुरस्सर बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. संस्था बळकावण्यात अपयश आल्याने काही “मोहऱ्याना” समोर करून तथ्यहीन आरोप करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांनी स्पष्ट केले. सोमवारी दुपारी ते येथील रंगनाथ चेंबर मध्ये आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक काही महिन्यांपूर्वी पार पडली. यात पुन्हा एकहाती सत्ता स्थापन करण्यात ऍड. काळे गटाला यश आले तर विरोधकांचा सुपडासाफ झाला. यामुळे हतबल विरोधकांनी सूडबुद्धीने संस्थेची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वणी, मारेगाव, मुकुटबन, वणी ग्रामीण, यवतमाळ, आर्णी, घाटंजी, चंद्रपूर, राजुरा, भद्रावती, मूल, वरोरा, गडचांदूर, चिमूर, ब्राह्मपुरी व वडसा या ठिकाणी शाखा आहेत. शेकडो दैनिक अभिकर्ते संस्थेच्या उन्नतीसाठी झटताहेत तर काही अभिकर्त्यांनी संस्थेची बदनामी चालवल्याने त्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच व्यावहारिक अनियमितता करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले होते.

संस्थेतून कमी करण्यात आलेल्या सुनील सदाशिव पाचभाई, विकास भानुदास तिखट, प्रसाद किरण खडसान व अमोल पुरुषोत्तम नावडे यांनी संस्थेच्या विरोधात विविध ठिकाणी तक्रारी केल्या तर यवतमाळ येथे पत्र परिषद घेऊन श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर विविध आरोप केले. या सर्व आरोपांचे अँड. देवीदास काळे यांनी पत्रकार परिषदेतून खंडन केले.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल प्रचंड मोठया स्वरूपाची आहे. तब्बल 800 कोटीच्या ठेवी, 451 कोटी कर्ज वाटप व 872 कोटी खेळते भांडवल असलेल्या या विशाल वटवृक्ष रुपी संस्थेत 58 हजार सभासद आहेत. विदर्भातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेची बदनामी करून संस्थाच गिळंकृत करण्याचे षडयंत्र तर रचल्या जात नाही ना असा संशय बळावत आहे.
वणी : बातमीदार