Home Breaking News मनसेच्या अल्टीमेटम मुळेच चना खरेदी सुरु

मनसेच्या अल्टीमेटम मुळेच चना खरेदी सुरु

274
C1 20240404 14205351

शेतकऱ्यांच्या हितासाठी केला होता ‘राडा’

वणी: खरेदी विक्री संघाने ऐन हंगामात नाफेडची चना खरेदी बंद करण्यात केली होती. शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचे वास्तव समोर येताच मनसेने प्रशासनाला धारेवर धरत अल्टीमेटम दिला होता. प्रशासनाने तातडीने दखल घेत बुधवार दि. 1 जून पासून मार्केटयार्ड मध्ये चना खरेदी सुरु करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

वणी उपविभागात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणल्या जातो. तसेच रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडने हमीभाव केंद्र सुरू केली होती. परंतु शासनाचे चना खरेदीचे उददीष्ठ पुर्ण झाल्यामुळे अचानक दि. 25 मे पासून चना खरेदी बंद केल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते.

नाफेडच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत खरेदी बंद करण्याच्या किमान आठ दिवस आधी पूर्वसूचना देणे अपेक्षित असताना येथील खरेदी विक्री संघाने खरेदीचं बंद केली. यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांना आपबिती कथन केली. प्रकरणाचे गांभीर्य बघता महाराष्ट्र सैनिकांसह ते खरेदी विक्री संघात पोहचले आणि शेतकरी हितार्थ ‘राडा’ केला आणि अल्टीमेटम देत तात्काळ तोडगा काढावा अन्यथा ‘खळखट्याक’ चा इशारा दिला होता.

अखेर नाफेड ने बुधवार दि. 1 जून पासून बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये चना खरेदी सुरु करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उघडयावर चना खरेदी करणे शक्य नसल्यामुळे उपलब्ध असलेल्या टिनाचे शेड मध्ये खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सुध्दा करण्यात आली आहे. मनसेच्या दणक्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे सकृतदर्शनी दिसत असून ऐन हंगामात बळीराजा सुखावणार आहे.
वणी: बातमीदार