Home Breaking News Balu Dhanorkar : साश्रूनयनांनी अखेरचा निरोप, अंत्य दर्शनासाठी उसळला जनसागर

Balu Dhanorkar : साश्रूनयनांनी अखेरचा निरोप, अंत्य दर्शनासाठी उसळला जनसागर

● अल्पशा आजाराने दुःखद निधन ● निखळ, डॅशिंग राजकारणी हरवला

2742

अल्पशा आजाराने दुःखद निधन
निखळ, डॅशिंग राजकारणी हरवला

Balu Dhanorkar Death: चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान 30 मे ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. वरोरा येथील निवासस्थानातून आज बुधवारी 11 वाजता अंतीमयात्रा निघणार असून राज्यातील अनेक नेते चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला आहे. MP Balu Dhanorkar died tragically on May 30 due to a short illness during treatment.

बाळू धानोरकर यांचे अल्पशा आजाराने झालेले निधन संपूर्ण विदर्भासाठी व काँग्रेससाठी दुःखद घटना आहे. तडफदार, डॅशिंग युवा नेता हरपल्याने काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पूर्वाश्रमीचे ते धडाकेबाज शिवसैनिक होते, तर 2014 मध्ये त्यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघात भगवा फडकवला होता. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदारकीची निवडणूक लढवली आणि संपूर्ण महाराष्ट्रात ते एकमेव खासदार म्हणून विजयी झालेत. त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान आहे.

बाळू धानोरकर याचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी वरोरा शहरासह जिल्ह्यातील कार्यकत्यानी गर्दी केली आहे. अंत्यदर्शनासाठी राज्यातील मोठे नेते दाखल सुद्धा दाखल झाले आहेत. खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला असून वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Rokhthok News
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)