Home वणी परिसर संगीत म्हणजे भगवंत प्राप्तीचा मार्ग

संगीत म्हणजे भगवंत प्राप्तीचा मार्ग

58

* संजय पिंपळशेंडे यांचे प्रतिपादन

* मासिक संगीत सभा संपन्न

    वणी: जैताई देवस्थान व संस्कार भारती समितीच्या वतीने  मासिक संगीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भगवान श्रीकृष्णांवर आधारित बहारदार भक्तिमय गीत करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मासिक संगीत सभा हा एक स्तुत्य उपक्रम असून, संगीत हे माणसाचे जीवन बदलविणारे, आनंद देणारे व तणाव मुक्त करणारी साधना आहे. संगीताने भगवंत प्राप्ती होते.  जैताई  देवस्थान च्या वतीने असे स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत असे त्यांनी स्पस्ट केले. देवस्थानचे सचिव व सामाजिक कार्यात अग्रेसर, विविध उपक्रमास सदैव प्रोत्साहन देणारे माधवराव सरपटवार यांच्या  नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

या मासिक संगीत सभे मध्ये भव्य मंचावर प्रथमच सुरुवात करणारे मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध गायक अनिरुद्ध सुरतेकर यांनी “बाजेरे मुरलीय बाजे” या गीताने सुरुवात केली तसेच सुरेश वाडकर, रघुनाथ खंडाळकर, कल्याणजी गायकवाड यांचे विविध अभंग व गौळण सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्र्यंबकेश्वर जाधव यांनी आपल्या सुमधुर आवाजात गीतं सादर करून सगळ्यांवर नेहमी प्रमाणे छाप सोडण्यात कोणतीच कसर सोडली नाही. संगीताचा वारसा लाभलेली नवोदित कलाकारा मृदुल कुचनकर हिने “हरी म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा” “माझा कृष्ण देखिला काय” असे अभंग व गौळण सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. संजय मेश्राम यांनी गीतांना सुरेल हार्मोनियम साथसंगत केली. कार्यक्रमाचे संगीत नियोजन  प्रसिद्ध तबला वादक अभिलाष राजूरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन संस्कार भारती समितीचे प्रमुख सागर मुने यांनी केले असून सुत्रसंचलन प्रवीण सातपुते व आभार समीक्षा काटकर हिने केले. सुमन डेकोरेशन चे संचालक संदीप आस्वले, रंजना काटकर यांचे विशेष सहकार्य लाभले.