Home Breaking News अखेर …ते बाळ दगावले, नातेवाईक संतप्त

अखेर …ते बाळ दगावले, नातेवाईक संतप्त

● जन्माला आले होते अविकसित बाळ

2231
C1 20240404 14205351

जन्माला आले होते अविकसित बाळ

Wani News : वणीच्या ग्रामीण रुग्णालयात 29 जुलैला जन्माला आलेल्या नवजात बाळाचे शौच व लघवीचे अवयव अविकसित तर नाभी जवळून पोटाच्या आतील अवयव बाहेर आले होते. बाळाच्या व्यंगाला डॉक्टर जाबाबदर असल्याचा आरोप पालक व नातेवाईकांनी केला होता. ते बाळ एक महिन्यानंतर सोमवारी सकाळी दगावले. यामुळे नातेवाईक संतप्त झाल्याचे दिसून आले. The baby died a month later on Monday morning. This made the relatives angry.

नरेंद्र शंकर बुजाडे हे भगतसिंग नगर कनकवाडी येथील निवासी असून त्यांच्या पत्‍नी भाग्‍यश्री यांना 29 जुलैला ग्रामीण रुग्‍णांलयात प्रसुती करीता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्रसूतीपूर्व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. गर्भवती असताना तिसऱ्या व सहाव्या महिन्यात त्यांची सोनोग्राफी लोढा हॉस्पिटल येथील सरकार मान्य सोनोग्राफी सेंटर मध्ये करण्यात आली होती.

बाळ जन्माला आले असता नवजात बाळाचे शौच व लघवीचे अवयव अविकसित होते तर नाभी जवळून पोटाच्या आतील अवयव बाहेर आले होते. यामुळे बाळाचे पालक व नातेवाईकांना धक्का बसला. या प्रकरणी बाळाच्‍या वडीलांनी डॉ. महेंद्र लोढा यांचेवर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलीसांत तक्रार नोंदवली. आरोप प्रत्यारोप व्हायला लागले यामुळे डॉ लोढा यांनी ग्रामीण रूग्णालयातील मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.

अविकसित व व्यंग असलेले बाळ जन्माला आले, मात्र प्रसूतीपूर्व तिसऱ्या व सहाव्या महिन्यात लोढा हॉस्पिटलमध्ये leval-1 ची सोनोग्राफी केली होती. या दोन्ही रिपोर्ट मध्ये बाळ निरोगी व सुदृढ असल्‍याचे डॉक्टरांनी सांगितले होते असे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे. तर 3 डी सोनोग्राफी केंद्रावर जाऊन सोनोग्राफी केली असती तर जन्मापूर्वीच बाळाच्या शरीरस्वास्थ्य बाबत कळले असते असा दावा डॉक्टरांनी केला होता.

प्रसुती झाल्‍यावर नवजात बाळाच्‍या पोटातील अवयव बाहेर आल्‍याचे निदर्शनांस आले. यामुळे त्‍या बाळावर शस्‍ञक्रिया होणे गरजेचे होते. अखेर एक महिण्यापूर्वी जन्माला आलेले बाळ दगावले आहे. त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शव नातेवाईकांना सोपवण्यात आले.
Rokhthok News