Home Breaking News आ. बोदकुरवार यांना मातृशोक

आ. बोदकुरवार यांना मातृशोक

559

अल्पशा आजाराने निधन

वणी: वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मातोश्री पार्वताबाई बापूराव बोदकुरवार यांचे वयाच्या 81 व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवार दि.31 डिसेंबर ला पहाटे निधन झाले.

त्यांचेवर झरी तालुक्यातील लिंगटी या मूळ गावी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले व दोन मुली व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. हसतमुख मातोश्री च्या निधनाने आ. बोदकुरवार यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(रोखठोक परिवारांकडून विनम्र श्रद्धांजली)