● रब्बी हंगामात सर्वोतोपरी मदत
● मशागत ते पीक निघेपर्यंत अर्थसाहाय्य
वणी | विदर्भात पावसाने चांगलाच धुमकूळ घातला होता. त्यातल्या त्यात वणी विधानसभा क्षेत्रात ढगफुटी चा प्रत्यय आला. त्यातच धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदी, नाल्यानी विक्राळ रूप धारण केले आणि अनेक गावांत पाणी शिरले, हजारो हेक्टर शेती खरडून गेली. शेतकरी उध्वस्त झाला, जनजीवन विस्कळीत झाले आणि पूर पीडितांच्या मदतीला मनसे सरसावली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकरांनी “सरकार नाही म्हणून काय झाले? आम्ही आहोत ना…” म्हणत मदतीचा सपाटा पहिल्या दिवसापासून सुरू केला. वणी व मारेगाव तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली होती, हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. पुरपीडितांना पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य वाटप करण्यात आले. पशुधनाच्या चाऱ्याची पूर्तता केली. तेलंगणा राज्यातून चारा आणला, आद्यपही मदतीचे काम महाराष्ट्र सैनिक करताहेत.
उप विभागातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शासनस्तरावरुन होणाऱ्या उपाययोजनेला विलंब लागत आहे. राज्यात सरकार स्थापन झाले मात्र राज्य कारभाराचा गाडा दोघेच हाकताहेत. मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे पूरपरिस्थितीत निर्माण झालेल्या विदारक स्थितीचे निवारण अद्याप झालेले नाही. सरकार नाही म्हणून काय झाले? ‘आम्ही आहोत ना…’ असे म्हणत मनसे शेतकऱ्यांसाठी सरसावली आहे.
राजू उंबरकर यांनी आपल्या स्तरावर ‘सन्माननीय राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना’ यवतमाळ जिल्ह्यात सुरू केली आहे. या योजनेत रब्बी हंगामाकरिता पुरपीडित अल्पभू-धारक शेतकऱ्यांना मशागत खर्च, बी- बियाणे, खते, कीटकनाशके व शेतीपयोगी साहित्य शेतकऱ्यांना घरपोच देण्यात येणार आहे. याशिवाय दोन टप्प्यांत पाच, पाच हजार, असे एकूण 10 हजार रुपये या योजनेत सामावून घेतलेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे उंबरकरांनी स्पष्ट केले आहे.
वणी: बातमीदार