Home Breaking News आणि….कालव्यात टँकर कोसळला, चालक ठार

आणि….कालव्यात टँकर कोसळला, चालक ठार

259

मारेगाव तालुक्यातील घटना

मारेगाव: तालुक्यातील कुंभा परिसरात बेंबळा कालव्याचे बांधकाम सुरू आहे. तेथील प्रगतीपथावर असलेल्या कामांना पाणी पुरवठा करताना अचानक टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट कालव्यातच टँकर कोसळला यात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 24 मार्चला दुपारी घडली.

Img 20250619 wa0016

शिवदास जयसिंग राठोड (64) रा. करंजी असे अपघाती निधन झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या कामांना पाणी पुरवठा करत असता अचानक त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अकस्मात वाहन कालव्यात कोसळले.

Img 20250103 Wa0009

टँकर कालव्यात कोसळताच उपस्थितांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी वाहन चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. ग्रामस्थांनी अपघाताची सूचना मारेगाव पोलिसांना दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रवाना करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
मारेगाव : बातमीदार

Previous articleबनावट FDR प्रकरण विधिमंडळात
Next articleयुवकांनी भगतसिंगांचे विचार आत्मसात करावेत..!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.