Home Breaking News आणि..सरपंचासह दोन सदस्य अपात्र, धडाकेबाज कारवाई

आणि..सरपंचासह दोन सदस्य अपात्र, धडाकेबाज कारवाई

1072

जात वैधता प्रमाणपञ सादर न केल्याने ओढवली नामुष्की

ज्योतिबा पोटे : तालुक्यातील बोटोणी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयश्री प्राप्त करून सरपंच पदावर आरूढ झालेल्या सुनिता जुमनाके यांनी विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपञ सादर केले नाही. यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. असाच प्रकार दोन सदस्यांबाबत घडल्याने चांगलीच खळबळ माजली असून उपसरपंच प्रविण वनकर यांचेकडे सारपंचपदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

Img 20250601 wa0036

मागील वर्षी चिंचोणी बोटोणी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक घेण्यांत आली होती. या निवडणुकींत सुनिता जुमनाके तथा आश्वीनी मडावी यांनी येथील वार्ड क्रमाक एक मधुन अनुसुचित जमातीच्या स्री राखीव मतदार संघातुन निवडुक लढविली होती तर सुवर्णा ठक यांनी वार्ड क्रमांक दोन मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्री राखीव मतदार संघातुन निवडणुक लढविली होती. निवडणुकीत त्यांनी विजयश्री मिळविल्या नंतर जुमनाके यांची सरपंचपदी वर्णी लागली.

Img 20250103 Wa0009

नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांनीं वर्षभरात जात वैधता प्रमाणपञ सादर करण्याबाबत हमीपत्र सादर केले होते. मात्रं त्यांनी मुदत संपल्यानंतर ही जात वैधता प्रमाणपञ सादर केले नाही. प्रकरणी माजी सरपंच महादेव सिडाम यांनी विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारींची दखल घेत प्रशासनाने निवडणुक आयोगाच्या आदेशाची अमलबजावणी करत अपात्रतेची कारवाई केली आहे.

निकाला नंतर ही जागा रिक्त झाली होती प्रशासकिय कामकाज सुरळीत चालविण्यासाठी येथील विद्यमान उपसरपंच प्रविण वनकर यांचेकडे मारेगाव पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी यांच्या प्रशासकिय सुचनापत्रान्वये हा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आता या तीनही रिक्त जागेची पोट निवडणूक कधी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मारेगाव: बातमीदार