Home Breaking News खरंच….JCB ची दुचाकीला धडक, तरुण ठार

खरंच….JCB ची दुचाकीला धडक, तरुण ठार

2737

मारेगाव तालुक्यातील घटना

रोखठोक | JCB हे अवजड वाहन, रात्रीच्या अंधारात मारेगाव च्या दिशेने येत होते. तर तरुण आपल्या दुचाकीने गावी परतत असतांना जबर धडक झाली. यात 21 वर्षीय तरुण घटनास्थळीच मृत्युमुखी पडला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 7: 30 वाजता घडली.

Img 20250619 wa0016

शिवम नामदेव आत्राम (21) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो सालेभट्टी येथील निवासी असून वैयक्तिक कामानिमित्त मारेगावला आला होता. सायंकाळी गावी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या JCB ने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली.

Img 20250103 Wa0009

या घटनेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, या प्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले असून नेमका दोष कोणाचा हे तपासाअंती स्पष्ट होणारच आहे. मात्र होतकरू तरुणांच्या अकस्मात निधनाने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा आप्तपरीवार आहे.
वणी: बातमीदार