Home Breaking News “गुंजन” चे नाव सातासमुद्रापार ‘गुंजले’, आता दहावीत सुद्धा प्राविण्य

“गुंजन” चे नाव सातासमुद्रापार ‘गुंजले’, आता दहावीत सुद्धा प्राविण्य

1679

शेतकऱ्यांची कन्या वर्धा जिल्ह्यात तिसरी

वणी: बौद्धिक क्षमतेचा अवाका ओळ्खणाऱ्याला तीक्ष्ण दृष्टीची गरज असते. कलागुणांना वाव मिळावं या करिता हिऱ्याला पैलू पडणाऱ्या जोहरी ची गरज असते. मारेगाव तालुक्यातील घोडदारा येथील शेतकऱ्यांची कन्या वर्धा जिल्ह्यात दहावीत तिसरी आली. परंतु यापूर्वी तिने सातासमुद्रापार वर्ल्ड बुक रेकॉर्ड ऑफ लंडन वर आपले नाव कोरले आहे.

Img 20250601 wa0036

मारेगाव तालुक्यातील घोडदारा येथील शेतकरी वसंता मिलमिले यांची सुपुत्री ‘गुंजन’ ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे शिकत आहे. तिने यावर्षी दहावीत जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिला तब्बल 95.40 टक्के गुण मिळाले आहेत.

Img 20250103 Wa0009

“गुंजन” च्या नावे अनेक रेकॉर्ड्स आहेत, 2021मध्ये उच्च उंचीच्या वैज्ञानिक फुग्याच्या मदतीने “एकाच प्रक्षेपण साइटवर सर्वाधिक फेमटो उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले (प्रत्येकी 100 फेमटो उपग्रह वेगळ्या प्रयोगासाठी डिझाइन केलेले)” डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन – हाऊस ऑफ कलाम आणि मार्टिन ग्रुप हे संपूर्ण भारतातील विद्यार्थी एकत्र करतात. या कार्यक्रमात गुंजन सुद्धा सहभागी झाली होती. सदर उपग्रह 7 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम, भारत येथे प्रक्षेपित केले गेले.

गुंजनला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सह,असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड रिसर्च फाउंडेशन, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, स्पेस ऑन ऑफ इंडिया यांच्याकडून गौरविण्यात आलेले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलीने घेतलेली ही भरारी कौतुकास्पद असली तरी तिने मारेगाव चे नाव सातासमुद्रापार कोरले आहे.

आई-वडील शेतकरी असून घरात कुणीही सुशिक्षित नसताना दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या गुंजन चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. ती हे श्रेय आजोबा सदाशिव मिलमिले, आजी विमल मिलमिले, वडील वसंता मिलमिले, आई सपना मिलमिले यांच्या सह शाळेतील प्राचार्य शिक्षक यांना देते.
वणी: बातमीदार