Home Breaking News जिवंत वीज तारेचा स्पर्श, कंत्राटी कामगाराचा मृत्यू

जिवंत वीज तारेचा स्पर्श, कंत्राटी कामगाराचा मृत्यू

4400

गोकुळ नगर परिसरातील घटना

वणी: शहरातील गोकुळ नगर परिसरातीळ 11 केव्ह च्या जिवंत वीज तारेला कंत्राटी कामगाराचा स्पर्श झाला. यात जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 14 जूनला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली.

Img 20250601 wa0036

रजत अवचट (24) असे मृतकाचे नाव आहे. तो रंगारीपुरा येथील निवासी आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या दरम्यान शहरातील काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या मध्ये गोकुळ नगर येथे सुध्दा वीज गुल झाल्याने स्थानिकांनी महावितरण कंपनीला अवगत केले होते.

Img 20250103 Wa0009

पाऊस थांबताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत कंत्राटी कामगार असलेला रजत अवचट गोकुळ नगर परिसरात गेला होता.या परिसरालगतच 11 केव्ही चे सब स्टेशन आहे. विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा नादात चुकीने 11 केव्हीच्या जिवंत वीज तारेला स्पर्श झाल्याने त्याला जबर धक्का बसला. उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वणी: बातमीदार