Home Breaking News त्या… अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

त्या… अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

984

गौराळा रोपवाटिका जवळची घटना

वणी: यवतमाळ मार्गावरील गौराळा येथे रोपवाटिके समोर मालवाहू वाहन व दुचाकीचा समोरासमोर जबर अपघात झाला. यात 60 वर्षीय दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि.3 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली.

Img 20250601 wa0036

बाळकृष्ण पाचभाई (60) असे मृतकाचे नाव आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातील कवठाळा येथील निवासी होते. तर त्यांचे सोबत असलेले शिवदास पायघन (62) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Img 20250103 Wa0009

घटनेच्या दिवशी बाळकृष्ण पाचभाई व शिवदास पायघन हे दोघे केळापूर जवळील वाई येथून उपचार करून आपल्या गावी दुचाकी क्रमांक MH- 22- AH- 8606 ने परतत होते. यवतमाळ मार्गावरील गौराळा लगत रोपवाटिका समोर भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली.

अपघात भीषण होता यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जमलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. प्रकृती गंभीर असल्याने जखमी पायघन यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलवण्यात आले आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
वणी: बातमीदार