Home Breaking News त्‍या….नरभक्षी वाघांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी वन विभाग ‘जंगलात’

त्‍या….नरभक्षी वाघांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी वन विभाग ‘जंगलात’

2320

मृतकांच्‍या परिवारांला आर्थिक मदत

रोखठोक | तालुक्‍यात वाघांने चांगलाच धुमाकूळ माजवला आहे, दरदिवशी होणारे वाघ्रदर्शन शेतकरी शेतमजुरांना भयभित करणारे आहेत. अवघ्‍या काही दिवसातच दोघांचा बळी व एकाला जखमी केल्‍यानंतर वन विभाग खडबडून जागा झाल्‍याचे दिसत आहे. कोलार पिंपरी येथे गुराख्‍याला ठार केल्‍यानंतर वाघांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी रेस्‍कू पथकाला पाचारण करण्‍यात आले तर पिंजरा घेवून अधिकारी घटनास्‍थळी सापळा लावताहेत.

Img 20250601 wa0036

रामदास पिदुरकर (58) हे रविवारी नेहमी प्रमाणे गुरे ढोरे घेवून कोलार पिंपरी शिवारात चराईला गेले होते. जनावरं चरत होते तर गुराखी एका झाडाखाली विसावा घेत असतांना दबा धरून बसलेल्‍या वाघाने त्‍यांच्‍यावर झडप घेतली. त्‍यांनी आरडा ओरड करण्‍याचा प्रयत्‍न केला माञ तो पर्यंत वाघांने सर्व खेळ खल्‍लास केला.

Img 20250103 Wa0009

चराईला गेलेली गुरं आपापल्‍या घरी परतली माञ गुराखी घरी परतलेच नाही. घरची मंडळी चिंताग्रस्‍त झाली, त्‍यांची शोधाशोध करण्‍यात आली, परंतु ते आढळून आले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्‍हा ग्रामस्‍थांनी शोधकार्य आरंभले असता शेतशिवारातील झुडूपात छिन्‍नविछीन्‍न अवस्‍थेतील मूतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली प्रशासनाला अवगत करण्‍यात आले.

काही दिवसापुर्वी तालुक्‍यात भुरकी येथील अभय देवूळकर (25) या युवकाला वाघाने ठार केले होते. तर ब्राम्‍हणी येथे टॉवरचे काम करणाऱ्या उमेश पासवान (35) या मजुरांवर 24 नोव्‍हेबरला वाघाने हल्‍ला चढवला होता त्‍यात तो गंभीर जखमी झाला होता. वाघाने तालुक्‍यात चांगलाच आतंक माजवला, पशूधनाचा फडशा पाडणे नित्‍याचेच झाले असतांना दि. 27 नोव्‍हेंबरला कोलार पिंपरी येथे गुराख्‍यावर वाघाने हल्‍ला करून ठार केले. वाघाने आता पर्यंत दोघांचा बळी तर एकाला जखमी केले आहे.

कोलार पिंपरी येथे घडलेल्‍या घटनेने प्रशासन हादरले तर आ. संजीवरेडडी बोदकुरवार व मनसेचे राज्‍य उपाध्‍यक्ष राजु उंबरकरांनी तातडीने घटनास्‍थळ गाठले. वन विभागाचे मुख्‍य वनसंरक्षक व्‍ही. टी. घूले, DFO किरण जगताप तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, पांढरकवडा येथील रेस्‍कू पथक पिंजरा घेवून घटनास्‍थळी कोलार पिंपरी येथे पोहचले आहे. माञ वाघांचा वावर पुनवट परिसरात असल्‍याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्‍यामुळे पथक वाघांच्‍या मागावर पोहचले आहेत.

या प्रकरणी मृतकाच्‍या परिवाराला तातडीने दहा लाख रूपयांचा धनादेश देण्‍यात आला असुन उर्वरीत दहा लाख रुपयांचे फिक्‍स डिपॉझीट करण्‍यात येणार आहे. तर वेकोलीच्‍या माध्‍यमातुन 20 हजार रूपये अंत्‍यविधी करीता देण्‍यात आले आहे. वाघांचा तालुक्‍यातील मुक्तसंचार शेतकरी शेतमजुरांकरीता भयभीत करणारा असुन नरभक्षी वाघाला तात्‍काळ जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करताहेत.
वणी: बातमीदार

ही बातमी सुद्धा वाचा…

https://rokhthok.com/2022/11/28/18137/