Home Breaking News चक्क…महिलेने लांबवले दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख रुपये…!

चक्क…महिलेने लांबवले दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख रुपये…!

2327

टरबूज घेणे पडले महागात
पोलिसांची शहरातील दहशत मावळली

वणी : चोरांडे खुलेआम वावरत असल्याचे वास्तव मंगळवारी पुन्हा उजागर झाले आहे. नगर पालिकेच्या अगदी समोर उभी केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख रुपयांवर चक्क महिलेने हात साफ केल्याची घटना दुपारी 12:30 वाजता घडली.

Img 20250601 wa0036

जैन ले आऊट परिसरात वास्तव्यास असलेले आनंदराव गंगाराम कोकमवार यांनी स्टेट बँकेतून दोन लाख रुपये विड्रॉल केले. तसेच ती रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली व नगर पालिकेच्या अगदी समोर टरबूज घेण्यासाठी थांबले. त्यावेळी त्यांच्या दुचाकी जवळ एक महिला व सात वर्षाची मुलगी उभी होती.

Img 20250103 Wa0009

कोकमवार परत आल्यावर त्यांना संशय आल्याने त्यांनी डिक्की तपासली असता त्यातील रोकड असलेली थैली गायब होती. त्यांनी आजूबाजूला विचारणा केली असता त्यांच्या दुचाकी जवळ महिला व मुलगी असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता ते पसार झाले.

कोकमवार यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही. मात्र शहरात असले भुरटे चोर व त्यांचे रॅकेट सक्रिय तर झाले नाही ना असा संशय या घटनेने निर्माण झाला आहे. त्याप्रमाणेच पोलिसांनी गस्त वाढवणे आणि आपली दहशत निर्माण करणे गरजेचे झाले आहे.
वणी: बातमीदार