Home Breaking News नियतीचा खेळ ! मालकांचे वर्षश्राद्ध आणि त्‍याच तारखेला नोकराचा अपघाती मृत्‍यू

नियतीचा खेळ ! मालकांचे वर्षश्राद्ध आणि त्‍याच तारखेला नोकराचा अपघाती मृत्‍यू

1945

मनाला चटका लावणारी घटना

रोखठोकः बरोबर एक वर्षापुर्वी भावासम मालकांचे दुचाकी अपघातात निधन झाले होते, एक वर्षानंतरच वर्षश्राध्‍द, त्‍या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी म्‍हणुन एकेकाळचा विश्‍वासु नोकर आपल्‍या सवंगडयासह दुचाकीने वरोरा येथे जायला निघाला आणि अघटित घडले.

Img 20250601 wa0036

वणी- वरोरा मार्गावर जिथे मालकांचा अपघात झाला अगदी त्‍याच परिसरात भरधाव कार ने त्‍यांच्‍या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोघे दगावलेत, दिवस होता 28 फेब्रुवारी. नियतीचा खेळ बघा तारीख सुध्‍दा तिच आणि घटनास्‍थळही तेच.

Img 20250103 Wa0009

वरोरा येथील निवासी राजु बिरीया यांचा येथे व्‍यवसाय होता व ते रंगारीपुरा येथे वास्तव्यास होते. ते नियमीत वरोरा ते वणी ये- जा करायचे. मागच्‍या वर्षी 28 फेब्रुवारीला आपल्‍या बुलेट दुचाकीने वणीकडे येत असतांना त्‍यांचा सावर्ला परिसरात  विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची आपसात धडक झाली यामध्ये त्‍यांचा मृत्‍यू झाला होता. त्‍यांचेच वर्षश्राध्‍द असल्‍याने विश्‍वासु नोकर आपल्‍या मिञांसमवेत वरोरा येथे जात असतांना भिषण अपघात झाला.

मंगळवारी सावर्ला परिसरात झालेल्‍या भिषण अपघातात अतुल ऊर्फ आकाश शंकर गाऊञे (27) रा. रंगारीपुरा आणि अमोल मडावी (32) रा. जैताई मंदिरजवळ,  या दोघांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला तर रानू तुमसाम (28) हा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

नियतीचा खेळ अजबच आहे, जी गोष्‍ट घडून गेल्‍यानंतर आपण त्‍या घटनेकडे बारकाईने बघतो. याबाबत अगोदर कोणालाच काहीही कल्‍पना नसते किंवा पुढे जे घडणार आहे त्‍यांची जराही चाहुल लागत नाही.  यालाच नियतीचा खेळ म्‍हणतात. भावासमान मालकांचा झालेला अपघाती मृत्‍यू,  बरोबर एक वर्षानंतर त्‍याच तारखेला विश्‍वासु नोकर व त्याचा मित्र यांचा झालेला अपघाती मृत्‍यू मनाला चटका लावून जाणारा आहे.
वणी: बातमीदार