Home Breaking News निवडणुकीत….अभिकर्ता असोसिएशन ठरणार का ‘निर्णायक’

निवडणुकीत….अभिकर्ता असोसिएशन ठरणार का ‘निर्णायक’

485

● संघटनेची पायाभरणी, लढाई न्याय हक्काची

वणी: वणीत अभिकर्त्यांच्या न्यायहक्कासाठी असोसिएशन एकवटली आहे. ऐन पतसंस्थेच्या निवडणुकीदरम्यान स्थापन झालेल्या असोसिएशनचा फटका नेमका कोणाला बसणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी अभिकर्ता असोसिएशन निवडणुकीत ‘निर्णायक’ ठरणार असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

Img 20250601 wa0036

शहरात पतसंस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. दैनिक बचत अभिकर्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अभिकर्ते पतसंस्थेच्या हिताकरिता कर्तव्य बजावतात. त्या सर्व अभिकर्त्यांना स्वतःच्या न्यायहक्कसाठी एकसंघ करण्याची जबाबदारी दैनिक अभिकर्ता असोसिएशनने उचलली आहे.

Img 20250103 Wa0009

स्थापन झालेले असोसिएशन कोणत्याही एका पतसंस्थेशी संलग्न नाही. विविध पतसंस्थेतील अभिकर्ते यात सहभागी होणार आहेत. केवळ अभिकर्त्यांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असल्याचा निर्वाळा असोसिएशनचे अध्यक्ष सागर बोढे यांनी दिला आहे.

दैनिक अभिकर्ता असोसिएशन स्थापनेच्यामागे विविध उद्देशांचा समावेश आहे. प्रामुख्याने संस्थेच्या हिताकरिता सदैव खस्ता खाणारे अभिकर्ते यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा कवच पुरविण्यात यावे तसेच अभिकर्त्यांचा न्यायहक्क हीच संस्थेची उन्नती ही ‘टॅग लाईन’ असोसिएशनची आहे.

सध्यस्थीतीत येथील प्रतिथयश पतसंस्थेची निवडणूक होत आहे. दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. अटीतटीच्या या रणसंग्रामात महत्वाचा घटक असलेला अभिकर्ता निर्णायक भूमिकेत असणार आहे. मोठ्या संख्येने असलेल्या सभासदावर या निवडणुकीतील जय-पराजय अवलंबून असते.

कोणत्याही पतसंस्थेच्या जडणघडणीत अभिकर्त्यांचे योगदान महत्वपूर्ण असते. सत्ताधारी आणि सभासदांना एका माळेत गुंफण्याचे काम अभिकर्ता करत असतो. अभिकर्ता असोसिएशन या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे औत्सुक्याचे ठरणार असले तरी खरे चित्र 14 जून नंतरच स्पष्ट होणारआहे.
वणी: बातमीदार