Home Breaking News पत्रकार संदीप बेसरकर यांना पितृशोक

पत्रकार संदीप बेसरकर यांना पितृशोक

402

दीर्घ आजाराने निधन

रोखठोक | न्युज आपली वणी चे संचालक संदीप बेसरकर यांचे वडील अशोक शिवाजी बेसरकर यांनी बुधवारी दुपारी दीर्घ आजाराने अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षाचे होते.

Img 20250619 wa0016

तालुक्यातील बोर्डा येथील मूळ रहिवाशी असलेले अशोक बेसरकार हे कम्युनिस्ट पक्षाचे खंदे समर्थक होते. त्यांनी अनेक आंदोलने व चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला होता. कालांतराने काही वर्षे त्यांनी पत्रकारिता देखील केली.

Img 20250103 Wa0009

गेल्या काही महिन्यांपासून त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसेच प्रकृती अस्वस्थामुळे त्यांचे वणी येथील काळे लेआऊट येथील निवासस्थानी दुपारी 4:30 वाजता निधन झाले. ते पत्रकार संदीप बेसरकार यांचे वडील असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व दोन नातवंडे असा आप्त परिवार आहे. उद्या सकाळी 10 वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Previous articleविष प्राशन करून संपवले जीवन
Next articleभीषण….दोन ट्रक समोरासमोर भिडले, चालक ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.