Home Breaking News बस अभावी विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागतात ‘यातना’

बस अभावी विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागतात ‘यातना’

468

तातडीने बस सुरू करावी अशी मागणी

वणी : रस्ता नादुरुस्तीचे कारण पुढे करत चंद्रपूर आगाराने चंद्रपूर ते मुकूटबन बसचा मार्गच बदलला. यामुळे कृष्णांनपुर, मोहदा व कुंन्ड्रा येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चक्क तीन ते पाच किलोमीटर पायदळ जावे लागते. बस अभावी विद्यार्थ्यांना यातना सहन कराव्या लागत असल्याने पालक संतप्त झाले असून स्थानिक ग्रामस्थांनी आगार प्रमुखाला निवेदन देत तातडीने बस सुरु करावी अशी मागणी केली आहे.

Img 20250619 wa0016

चंद्रपूर आगार ची चंद्रपूर ते मुकुटबन व्हाया शिंदोला, कृष्णांनपुर, मोहदा व कुंन्ड्रा अशी नियमित बस सुरू होती. कोरोना कालखंडात शैक्षणिक व्यवस्था कोलमडल्याने बस बंद असल्याची उणीव जाणवली नाही. कालांतराने बसफेऱ्या पूर्ववत सुरु झालेल्या असताना रस्ता नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करत उपरोक्त गावे असलेल्या मार्गावरून बसफेरी बंद करण्यात आली आहे.

Img 20250103 Wa0009

चंद्रपूर ते मुकुटबन ही बस कृष्णांनपुर, मोहदा व कुंन्ड्रा या गावातील रस्त्यावरून मार्गक्रमण करत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश विद्यार्थी मुकूटबन ला शाळा, शिकवणी वर्ग व महाविद्यालयात शिकताहेत. पूर्वी बस सुरू असल्याने त्यांना योग्यवेळी शाळा, महाविद्यालयात जाणे सोयीचे होते.

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपल्यास्तरावर तात्काळ बसफेरी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गजानन विधाते, तालुका सचिव संजय खाडे, माजी सभापती सुधाकर गोरे, विजय ठावरी, शिवराम आसुटकर यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार