Home Breaking News भीषण…दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि जीव गेला

भीषण…दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि जीव गेला

1416

जबर अपघातात तरुण ठार

वणी: तालुक्यातील पिंपरी कायर येथे वास्तव्यास असलेला 35 वर्षीय तरुण वणी वरून दुचाकीने गावी परत जात होता. पेटूर गावाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि जबर अपघात झाला यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 28 मे ला दुपारी तीन वाजता घडली.

Img 20250601 wa0036

संतोष विठ्ठल सिडाम (35) असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. तो पिंपरी कायर येथील निवासी असून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा. घटनेच्या दिवशी तो कामानिमित्त वणी ला आला होता. दुपारी गावी परत जाताना मुकुटबन मार्गावरील पेटुर जवळ त्याचे वाहन क्रमांक ( MH-29-N- 8402) नियंत्रण सुटले व तो रस्त्यावरच कोसळला.

Img 20250103 Wa0009

घडलेल्या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तात्काळ वणीतील रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे पश्चात पत्नी दोन मुले, आई, वडील व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. होतकरु युवकाच्या आकस्मिक मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
वणी: बातमीदार