Home Breaking News मावळत्या वर्षाला निरोप देणे जीवावर बेतले

मावळत्या वर्षाला निरोप देणे जीवावर बेतले

2170

● दुचाकीचा अपघात, एक ठार, एक जखमी

वणी : वर्षाच्या शेवटच्या दिवशी नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी गावावरून शहरात आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक जखमी झाला आहे.

Img 20250601 wa0036

निखिल गजानन बोढे (21) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो तालुक्यातील मंदर येथील रहिवासी आहे. दि 31 डिसेंबर ला निखिल व प्रफूल बोढे (31) हे दोघे चुलत भाऊ मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व जल्लोष करण्याकरिता दुचाकीने वणी आले होते.

Img 20250103 Wa0009

येथील एका हॉटेलमध्ये पार्टी करून रात्री उशिरा ते दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाले असता घुग्गुस मार्गावर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. यात निखिलला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रफुल जखमी झाला असून त्याचे वर उपचार सुरू आहे. मावळत्या वर्षात युवकाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वणीबातमीदार