Home Breaking News मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात गरजणार वणीचा ढाण्या ‘वाघ’

मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात गरजणार वणीचा ढाण्या ‘वाघ’

916

विदर्भाच्या प्रश्नावर करतील मत व्यक्त

सुनील पाटील | मनसेचा गुढीपाडवा मेळावा, महाराष्ट्र सैनिकांसाठी एक आगळावेगळा सोहळाच असतो. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईतील शिवाजीपार्क ‘राज’गर्जनेने दणाणून जाणार आहे. त्याच व्यासपीठावर विदर्भातील वणीचा ढाण्या वाघ राजू उंबरकर यांना भाषणाची संधी देण्यात आल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते लाखोंच्या जनसमुदायासमोर मत व्यक्त करणार आहेत.

Img 20250601 wa0036

मनसेचा गुढीपाडवा मेळावा दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार आहे. त्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. तयारीचा वेग वाढवला आहे. या मेळाव्यानिमित्त राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता लागली आहे. राज्यातील विस्कटलेल्या परिस्थितीवर त्यांचा कटाक्ष असणारच आहे.

Img 20250103 Wa0009

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी मनसेचे प्रमुख नेते व वक्ते आपली मतं मांडणार आहे. यावेळी पहिल्यांदाच हा बहुमान राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना मिळणार आहे. शिवाजी पार्क वरील पक्षाचा गुढीपाडवा मेळावा मनसे कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणीच असतो.

विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी विधानसभा मतदार संघातील शेकडो महाराष्ट्र सैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवतीर्थावर लाखोंच्या जनसमुदायासमोर राजू उंबरकर विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे.
वणी : बातमीदार