Home Breaking News यवतमाळ हादरले.. आर्णी मार्गावर दुहेरी हत्याकांड

यवतमाळ हादरले.. आर्णी मार्गावर दुहेरी हत्याकांड

1321

नेताजी नगर मधील तरुणांची निर्घृण हत्या

यवतमाळ शहरातील दुर्गा उत्सव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. सन उत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र समाजकंटक आपलं इस्पित साध्य करतांना घडलेल्या घटनेवरून सिद्ध होत आहे. आर्णी मार्गावरील पल्लवी लॉन जवळ दुहेरी हत्याकांड घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे.

Img 20250619 wa0016

आर्णी रोड वर पल्लवी लॉनच्या जवळ एका बाजूला एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला तर दुसऱ्या गेट समोर रक्ताच्या थारोळ्यात दुसरा व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याने कमालीची खळबळ माजली आहे.

Img 20250103 Wa0009

घटनेचे गांभीर्य बघता पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले. स्पॉट पंचनामा करण्याची कारवाई सध्यस्थीतीत सुरू आहे. घडलेली घटना टोळीयुद्धाचा प्रकार असावा असा संशय व्यक्त होत असला तरी नेमकी कोणत्या कारणाने हे हत्याकांड झाले याची शहानिशा पोलीस प्रशासन करत आहे.

नेताजी नगर परिसरातील दोघेही मृतक असावे असे बोलल्या जात असून पोलिसांनी चौफेर आपली यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असून LCB चे प्रमुख घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतक नेमके कोण आहेत या बाबत पोलीस तपास करत आहे. सुञांकडुन मिळालेल्‍या माहितीनुसार वासीम पठाण व उमेश येरमे असे त्‍या मृतकांची नावे असल्‍याचे बोलल्‍या जात आहे.
वणी: बातमीदार