Home Breaking News वाघाने पाडला बकरीचा ‘फडशा’

वाघाने पाडला बकरीचा ‘फडशा’

1116

रासा शिवारातील घटना

तालुक्यात गेल्या अनेक महिन्यापासून वाघाचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवार दि 19 नोव्हेंबर ला चराई साठी गेलेल्या बकरीवर वाघाने हल्ला चढवून फडशा पडला आहे.

Img 20250601 wa0036

तालुक्यातील रासा, सुकनेगाव व मारेगाव (कोरंबी) शिवारात गेल्या काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. दोन महिन्या पूर्वी याच परिसरात वाघाने बैलावर हल्ला चढवून जखमी केले होते. तर कोरंबी (मारेगाव) येथील युवकाला वाघा पासून बचाव करण्यासाठी झाडावर चढावे लागले होते.

Img 20250103 Wa0009

या परिसरात वाघाचा वावर असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले असून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात कॅमेरे लावण्यात आले आहे. वाघाचा जनावरंवर होत असलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी व शेतमजूर धास्तावला आहे.

रासा या गावातील गणपत सोनटक्के यांच्या मालकीच्या बकऱ्या जंगलात चराई साठी गुराखी शामनाथ पाचभाई याने नेल्या होत्या दुपारी 4 वाजताच्या सुमारास गजानन धांडे यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने बकरीवर हल्ला चढवून ठार केले.

गुराखी शामनाथ याने आरडाओरडा केल्याने शेजारी शेतात काम करणाऱ्या मजुरांनी धाव घेतली. त्यामुळे वाघाने बकरी सोडून जंगलात धूम ठोकली. या बाबत वन विभागाला सूचना देण्यात आली असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करीत आहे.
वणी: बातमीदार

Previous articleदिवाळी अंक प्रदर्शनी चे आयोजन
Next articleजागतिक शौचालय दिनाचे औचित्य आणि भूमिपूजन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.