Home Breaking News शिवसेनेचा अल्टीमेटम आणि बससेवा पुर्ववत

शिवसेनेचा अल्टीमेटम आणि बससेवा पुर्ववत

534

अखेर शिंदोला मार्गे बस सेवा सुरु

वणीः चंद्रपुर ते मुकूटबन व्हाया शिंदोला बसचा मार्ग नकोडा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे बंद करण्यात आला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी चंद्रपुर प्रशासनाला धारेवर धरत जिल्हा मार्ग बंद करणाऱ्या नकोडा ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी केली होती.

Img 20250619 wa0016

रविवार दि. 26 जुनला शिंदोला मार्गे जाणारी चंद्रपुर ते मुकूटबन ही बस बऱ्याच कालावधी नंतर सुरु करण्यात आली. यावेळी शिंदोला येथे बसचे पुजन करुन चालक व वाहक यांचे शाल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Img 20250103 Wa0009

कोरोनाचा कालखंड तसेच राज्यमार्ग परिवहन महामंडळातील कर्मचार्यांचा संप यामुळे बस चे अवागमन विस्कळीत झाले होते. या कालावधी दरम्यान नकोडा ग्रामपंचायतीने चक्क रस्त्यावर बॅरीकेट्स टाकून हा मार्गच बंद केला होता.

परिस्थिती निवळल्या नंतर सुध्दा यामार्गावरुन बसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्याने मुंगोली, माथोली, साखरा, परमडोह, चिखली, टाकळी, शेवाळा, चनाखा, कोलगाव, शिवणी, येनक, येनाडी, पाथरी, कुर्ली, शिंदोला व परिसरातील शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्गात शिकणारे विध्यार्थी- विद्यार्थिनींची तसेच महिला, गर्भवती, विविध आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेठीस धरण्यात आले.

प्रवाश्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता शिवसेना उपजिल्हा प्रमुख निखाडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी परिसरातील विध्यार्थी, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व नागरिकांसह 26 जून ला मुंगोली पुलावर चक्काजाम करण्यात येईल असा इशारा दिला होता. अखेर प्रशासनाने रास्त मागणी लक्षात घेता पुर्ववत बससेवा सुरु केल्याने परिसरातील नागरीकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी: बातमीदार

Previous articleजय सहकार ची विजयाकडे घोडदौड
Next articleमतदानाचा टक्का घसरला आणि धाकधूक वाढली
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.